CMP   
                   CMP द्वारे शासकीय प्रदान पध्दती बाबत सूचना 


                                                          दि. १८/०१/२०१३
माहे JAN.2014 PAID IN FEB.2014 ची वेतन देयके CMP प्रणाली मधून करणेबाबतच्या सूचना
शासनाच्या धोरणानुसार वेतन देयके हि धनादेश विरहीत करावयाची असल्याने CMP प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या प्रणाली व्दारे अदा होणारी रक्कम प्रत्यक्ष कर्मचारी यांच्या खात्यावर जमा होणार असल्याने पुणे कोषागाराअंतर्गत प्रथम 8 व नंतर 51 DDO ची वेतन देयके या CMP प्रणालीचा वापर करुन यशस्वी झाली आहेत.तसेच भविष्यात सर्व DDO चे वेतन देयके या प्रणाली व्दारे सादर करणेची आहेत.या बाबत वारंवार सूचना देऊनसुध्दा अद्यापपर्यंत काही कोषागारातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचा बँकेचा तपशील सेवार्थ प्रणालीत अचूक नोंदविण्यात आलेला नाही याबाबत श्री प्रियांश एसबीआय(सीएमपी) यांना माहे डिसेंबर 2013 देय जानेवारी 2014 या मासिक वेतन देयकाच्या काही ई फाईल प्राप्त झालेल्या आहेत त्यामध्ये ही चूक पुन्हा निदर्शनास आलेली आहे. याबाबत सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा CMP साठी निवडण्यात आलेल्या वेतनाबाबत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहे की,  सदर तपशील सेवार्थ प्रणालीत अचूकरित्या न भरल्यास व त्यामुळे अशासकीय वजातींच्या रकमा वर्ग होण्यास काही अडचणी उद्भवल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकारी जबाबदार राहतील व त्यानंतर याबाबत त्यांच्या कडून कोणतीही तक्रार आल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही याची जाणीव DDO नी संबंधितांना( वेतन लिपीकास) करुन देण्यात यावी. व ई फाईल सीएमपी प्रणालीवर अपलोड करताना विशेष खबरदारी घ्यावी. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या बँक खात्याची माहिती Current Path : Worklist > Payroll > DDO Profile > DDO Information या टॅबमध्ये अचूक भरलेली असल्याची खात्री करावी. सदर तपशील अचूक भरलेला नसल्यास व जोपर्यंत सदर तपशील अचूकरित्या भरला जात नसेल तोपर्यंत अशा संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची ई फाईल सीएमपी पोर्टलवर अपलोड करु नये. तसेच वेतन लिपीकाने  (BANK VERIFATION) बाबत कर्मचा-यांचे , DDO चे BANK ACCOUNT NO, IFSC CODE, .बरोबर असल्याची स्वता तपासून खात्री करावी. व मगच अंतीम निर्णय घ्यावा.
सदर सूचनेचे गांभीर्यपूर्वक पालन करण्यात यावे.
माहे नोंव्हेंबर 2013 देय डिसेंबर 2013 या महिन्यासाठी निवडण्यात आलेल्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचा सुध्दा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तरी याबाबत संबंधित कार्यालयांनी  याची दक्षता घेऊन जानेवारी 2014 या महिन्यासाठी निवडण्यात आलेल्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसोबत मागील महिन्यामध्ये निवडण्यात आलेल्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सुध्दा सीएमपी मार्फत वेतन अदा करण्याबाबत कार्यवाही करावयाची आहे. माहे  जानेवारी 2014 देय फेब्रुवारी 2014 या महिन्याकरीता सीएमपी व्दारे वेतनाचे प्रदान करण्यासाठी खालीलप्रमाणे सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
1. प्रथम आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या बँक खात्याची माहिती Current Path : Worklist > Payroll > DDO Profile > DDO Information या टॅबमध्ये अचूक भरलेली असल्याची खात्री करावी.
2. या दिनांकाअगोदर जर एखाद्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांने वेतन देयक अथवा Change Statement जनरेट केलेले असेल तर ते प्रथम Delete करावे.
3. Change Statement जनरेट करण्यापूर्वी Non-Govt. Recovery भरुन घेण्यात यावी.
4. कोषागाराने सांगीतल्यानंतरच BILL जनरेट करावे.
5.दि.22/01/2014 अखेर सेवार्थ् प्रणाली मधील डेटा व्यवस्थित असल्याची          खात्री करावी.

6. देयक जनरेट झाल्यानंतर सर्व Schedules व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यानंतर देयक Forward to BEAMS करावे .

-----------------------------------------********---------------------------------------

CMP portal Login साठी पूर्वी https://www.sbicmp.co.in/mahakosh या संकेतस्थळाचा वापर केला जात होता सदर संकेतस्थळा मध्ये बदल झालेला असून नवीन संकेतस्थळ https://cmp.onlinesbi.com असे आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.सदर संकेतस्थळावर गेल्यानंतर MAHAKOSH या विकल्पास निवडून नंतर LOGIN करावे. 

------------------------------------------********--------------------------------------


कोषागारामार्फत होणारी सर्व प्रदाने, त्रयस्थ अदाते, कर्मचारी यांच्या खात्यामध्ये परस्पर वर्ग करण्याच्या उदिदष्टाने वित्त विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेने, CMP ( Cash Management product Centre), State Bank of India यांचेशी करार करण्यात येत आहे .  कोषागारातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची प्रदाने CMP मार्फत करण्यात येणार आहेत .
आहरण व संवितरण अधिकारी यांना प्रस्तावित प्रदान पध्दतीमध्ये करावयाच्या कामकाजाच्या अनुषंगाने शासनाकडून सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत .   सदर सुचना या सोबत आपले अवलोकनार्थ सादर करण्यात आल्या आहेत .  संबंधीत सर्व सुचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन त्या अनुषंगाने आपले स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी .  प्रस्तावित प्रणालीच्या सुचना खालीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहेत .  

शासन विहीत सदर सुधारीत कार्यपध्दती यशस्वी करण्यात आपलेकडून पूर्ण सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे .


No comments:

Post a Comment