पेंशनर कॉर्नर


                  
  
    1 comment:

 1. प्रकाश गो. घाटपांडे
  डी २०२, कपिल अभिजात, डहाणुकर कॊलनी, कोथरुड पुणे ४११०३८
  E-mail:-prakash.ghatpande@gmail.com
  दिनांक - २८ जानेवारी २०१७
  पुणे शहर


  प्रति,
  मा. पोलिस आयुक्त
  पुणे शहर


  विषय :- वेतन पुनर्निश्चिती होणे बाबत स्मरणपत्र


  संदर्भ:-
  १) मा. अप्पर पोलिस महासंचालक व संचालक पोलिस बिनतारी विभाग मरा पुणे ८ यांचेकडील प्रलि-ई / आगाउ वेतनवाढी / २०१५/७६२६ दिनांक ९/१०/२०१५

  २) पुणे शहर पो.नोटीस दि. ९/८/२००७ पान नं १७२५ परि.क्र. १०८ आस्था ३(५)
  ३) यापुर्वीचा अर्ज दि. ५ मार्च २०१६ ४) यापुर्वीचा अर्ज दि. २९ ऑगस्ट २०१६

  अर्जदार:- प्र.गो.घाटपांडे (स्वेच्छानिवृत्त रेडिओ यांत्रिक [ASI] बिनतारी विभाग पुणे शहर) पीपीओ क्र. ११०७०१३१८२६

  मा.महोदय
  मी रेडिओ यांत्रिक [सहा. पोलिस उपनिरिक्षक बि.सं (अभियांत्रिकी) ] या पदावरुन दि. ३१.०३.२००७ (कार्यालयीन वेळेनंतर) पोलिस आयुक्त पुणे शहर यांच्या आस्थापनेवरुन स्वेच्छानिवृत्त झालो. त्यावेळी संदर्भ क्र. २ नुसार माझी वेतन निश्चिती करण्यात आली होती.त्यानुसारच पुढे ६ वा वेतन आयोग व निवृत्ती वेतन यासाठी निश्चिती करण्यात आली होती. परंतु संदर्भ क्र. १ नुसार कमी झालेल्या वेतनवाढी शासन निर्णयानुसार आता पुनर्प्रस्थापित करणे आवश्यक आहे.त्यामुळे माझ्या निवृत्ती वेतन व आनुषंगिक बाबी सुनिश्चित होणार आहेत. यापूर्वी मी यासाठीच दोन अर्ज केले असून त्याला ११ महिन्यांच्या कालावधी लोटला आहे
  तरी अर्जानुसार माझी पुनश्च योग्य ती वेतननिश्चिती त्वरीत करणेस विनंती आहे.तसेच वेतननिश्चिती झालेवर मला व सर्व संबंधितांना तसे कळविण्याची विनंती आहे.


  सहपत्रे- संदर्भ क्र १, २ व ३ व ४ ची झेरॊक्स प्रत

  आपला विश्वासू


  (प्र.गो.घाटपांडे
  स्वेच्छानिवृत्त रेडिओ यांत्रिक [ASI], बिनतारी संदेश विभाग पुणे शहर)

  प्रत सविनय सादर- 1) मा. अप्पर पोलिस महासंचालक व संचालक पोलिस बिनतारी विभाग मरा पुणे ८
  2)मा. स.पो.आ बिनतारी विभाग पुणे शहर

  ReplyDelete