विमाछत्र योजना 

 
 
विमा छत्र योजना २०२०-२०२१ Form भरण्यासाठी सूचना 
 
 
 
                 जुने MD सभासद 
 
                         विमा धारकाने NEFT द्वारे स्वतः THE NEW INDIA ASSURANCE CO.LTD. यांचे खात्यावर आवश्यक विमा हप्त्याची रक्कम जमा करून प्रदानाचा तपशील (NEFT/ON LINE TRAN. ID व दिनांक) तसेच MD15(10 अंकी) क्रमांक लिहावा तो मिळाला नसेल तर सेवार्थ क्रमांक लिहावा स्वतःचे नाव इंग्रजी (मोठी लिपी)मध्ये नमूद करावे  SWASTHY CARD NO हा आपल्याला मिळालेल्या कार्डवरील पहिल्या ओळीतील MD15(10 अंकी ) क्रमांक नमूद करावा.त्याचप्रमाणे आपण योजनेमध्ये नूतनीकरण करत असल्यामुळे ई-मेल मध्ये Renew  असा उल्लेख करून अशी सर्व माहिती विमा कंपनीला nia.142300@newindia.co.in / swasthy@mdindia.com या ई-मेल आयडी वर पाठविण्यात यावी. 
                       सन २०१९-२०२० या वर्षांकरताची विमाछत्र योजनेची मुदत दिनांक २४/०७/२०२० रोजी संपत आहे. सन २०२०-२०२१ या वर्षाकरिता नूतनीकरण करण्याची मुदत दिनांक २४/०७/२०२० पुढे ३० दिवसांपर्यंत राहील. 
 
 
नविन MD सभासद 


                         * जे कर्मचारी शासनाचे निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु यापूर्वी त्यांनी विमाछत्र योजनेत सहभाग घेतला नसेल व ते आता सभासद होऊ ईच्छित असतील तर त्यांनी त्याच्या Pension Payment order च्या पुस्तकांमधील पहिले , दुसरे व तिसरे पान तसेच त्यांना ज्या रकमेचा विमा घ्यावयाचा आहे त्याची रक्कम NEFT द्वारे स्वतः THE NEW INDIA ASSURANCE CO.LTD. यांचे खात्यावर जमा करून प्रदानाचा तपशील (NEFT/ON LINE TRAN. ID व दिनांक) ची छायांकित प्रत घेऊन कोषागारात उपस्थित रहावे. त्यानंतर आपल्याला विहित नमुन्यातील फॉर्म दिला जाईल.
                   
                          * जे  कर्मचारी शासनाचे निवृत्तीवेतन घेणार आहेत तसेच शासनाचे कर्मचारी सेवेत कार्यरत आहेत व ते विमाछत्र योजनेचे सभासद होवू इच्छित असेल तर अशा कर्मचारी यांनी आपल्या कार्यालयामार्फत महाकोष वरील विमाछत्र या विकल्पावर क्लीक करून स्वास्थ्य प्रणालीमध्ये आपली माहिती भरावी. माहिती भरलेली स्वास्थ्य प्रणालीची प्रत व कार्यालयाचे नवीन सभासद झाल्याचे पात्र या कार्यालयास सादर करावे.



NEFT/ONLINE पैसे पाठविण्यासाठीचा विमा कंपनीचा बँक तपशील खालील प्रमाणे 

THE NEW INDIA ASSURANCE CO.LTD
A/C/NO.- 911020038067076
AXIS BANK IFSC CODE - UTIB0000230




* विमा छत्र योजना शासन निर्णय दि.१३/०७/२०२०

* विमा छत्र परिपत्रक दि १५/०७/२०२०

 










No comments:

Post a Comment